भाजपच्या गडाला खिंडार; नागपूरमध्ये अभिजीत वंजारी यांचा विजय.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     Dec 04, 2020
नागपूर:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी हे विजयी झाले आहेत. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.


नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही.

अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला. यानुसार वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. सकाळी 9.30 ला ते विजयी प्रमाणपत्र घेण्यास मतदान केंद्रावर जाणार आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडीचे अभिजित वंजारी यांना 56155, तर भाजपाच्या संदीप जोशी यांना 41622 मते.