भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नातुन घुग्घुस येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृह विलगीकरनाची सोय.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 11, 2020
चंद्रपूर:- घुग्घुस येथील कोरोना पाॅझीटीव रुग्णांना गृह विलगीकरणात घरी राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे घुग्घुस येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चंद्रपुर येथील वन अकॅडमीत विलगीकरणात ठेवण्यात येत होते. 
घुग्घुस येथील ज्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतःच्या घरी एकटे राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. अश्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय स्वतःच्याच घरी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चंद्रपुर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व चंद्रपुर जिल्हा शैल्यचिकीत्सक निवृत्ती राठोड व आरोग्य अधिकारी गेलहोत यांच्याशी चर्चा करून विनंती केली व घुग्घुस येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व ज्यांच्या मध्ये लक्षणे नसतात अश्या रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

        घुग्घुस ह्या औद्योगिक शहराची लोकसंख्या मोठी आहे. घुग्घुस शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चंद्रपुरात धाव घ्यावी लागत असे.

         घुग्घुस शहर हे चंद्रपुर जिल्ह्याच्या जवळच असल्याने घुग्घुस शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या विनंती नुसार घुग्घुस येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची मागणी मंजूर करण्यात आली आहे.