बाम्हणगाव ता. चिमूर येथील घटना.
चिमूर:- चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पाच्या शेजारच्या बाम्हणगाव येथील एका महिलेला वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला असून वर्षभरात तालुक्यातील सहावी घटना आहे. वाघाच्या हल्ल्यात बाम्हणगाव ता. चिमूर येथील विद्या वाघाडे वय 40 वर्ष या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.