आता व्हॉट्सअप (what'sup) वरुनही करता येणार पैसे ट्रान्स्फर; NPCI ने दिली परवानगी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   Dec 17, 2020
व्हॉट्सअपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, आता व्हॉट्सअपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

(Update what'sup)

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.



व्हॉट्सअ‍ॅपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. भारतातील व्हॉट्सअ‍ॅपचे युजर्स पाहता व्हॉट्सअ‍ॅपला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्व्हिस Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार आहे.