कार आणि टू व्हीलरच्या धडकेत तीन युवक गंभीर जखमी.

चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गावरील साईकृपा विद्यालय जवळील घटना.
Bhairav Diwase. Dec 17, 2020



पोंभुर्णा:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार  चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गावर साईकृपा विद्यालय जवळ कार आणि टू व्हीलरचा अपघात झाला. हि घटना 3:30- 4:00 वाजताच्या सुमारास घडली. गंभीर जखमी व्यक्तींची नावे कालिदास सुखदेव उईके (वय अंदाजे 25), अनिल सुखदेव उईके (वय अंदाजे 28), पियुष पुरुषोत्तम उईके (वय अंदाजे 14) हे चिंतलाधाबा येथील रहिवासी आहे. या धडकेत तीन युवक गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पायाला जबर मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात चंद्रपुर येथे नेण्यात आले आहे. पुढिल तपास पोंभुर्णा पोलिस करीत आहे.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने