राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य कार्यक्रम बोर्डा झुलुरवार येथे संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील ७० टक्के लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसास आहे. ग्रामीण भगातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे शेती वर अवलंबून आहे.
परंतु सध्या घडीला संपूर्ण देशात रोजगाराचे प्रमाण अत्यल्प झाले. व त्यातूनच बेरोजगाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली. प्रत्येक वस्तुची महागाई वाढली. आज प्रत्येक कुटुंबात आपला उदरर्निर्वाह करणे कठिन झाले. परिणामी प्रत्येक शेतकरी शेतीतुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न यावे. यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर सुरु केला. परिणामी उत्पन्नात घट तर झालीच, शिवाय मानवी आरोग्य धोक्यात येवून आयुर्मान सुधा कमी झाले.
याचेच गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कृषी व्यवस्थेत बदल करण्याचे महत्वपूर्ण कार्य सुरु केले आहे. त्याचीच अमलबजावानी म्हणून पोंभुर्णा पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने मौजा. बोर्डा झूल्लुरवार येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम घेण्यात आला. हजारे सरानी जमिनीची सूपिकता टिकविणे, येरगुडे सरानी पानी व्यवस्थापन, व माती परीक्षण, तर शालिक रामटेके यानी प्रात्यक्षिक पारंपरिक पिक पद्धत यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी. एन. बारामते मंडळ कृषी अधिकारी पोंभुर्णा, कार्यक्रमाचे उद्घाटक शालिकजी रामटेके, कार्यक्रमाचे मार्गदर्षक कमलेश हजारे, वसुदेव येरगुडे (आय. एम. सी.) होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाकुडकर कृषी सहाय्यक यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विकास रामटेके पो. पाटिल, मंसाराम कुंभरे तं.मु.स.अध्यक्ष, रामदास रामटेके, उमाकर रामटेके, अमोल बोबाटे, मनीषा कोहले, कविता आत्राम, छाया बुराडे,अनिल नेताम, गावकारी मंडली इत्यादि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होनेसाठी सर्वानी अथक परिश्रम घेतल्या बदल भांडेकर कृ. सहायक चेक हतिबोडी, व कृषि मित्र आकाश रामटेके यानी सर्वांचे आभार मानले.