Top News

चंद्रपूर जिल्ह्यात व सिंदेवाही तालुक्यात अवैद्य धंद्यांकडे तरुणांचा कल:- मनोहरराव पवार



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी ही शासनाने एप्रिल २०१५ मध्ये लागू केली. आणि त्याची कडक अंमलबजावणी ही फक्त दोन-तीन महिने केली. त्यानंतर प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे दारूबंदी ही आज कागदावरच मर्यादित आहे. त्याचाच परिणाम तरूण पिढीवर होत आहे. काही तरुण ही दारूच्या आहारी जाऊन वेगवेगळ्या आजाराशी अल्पवयातच लढा देत आहेत. आणि नको त्या वयात वाईट मार्गावर पाऊल टाकत आहेत.कमी वेळेत श्रीमंत होण्याची स्वप्ने बघून "कमी मेहनतीत जास्त पैसा " म्हणजेच एकमेव दारूविक्री व्यवसाय हा पर्याय निवडून दारू विक्रीकडे युवा वर्ग वळल्याच चित्र आज चंद्रपूर जिल्ह्यात व जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पहावयास मिळत आहे. तसेच सिंदेवाही तालुक्यात रोजगाराअभावी जास्तच तरुण दारूविक्रीकडे वळले आहेत. गांजा, सिगारेट ,तंबाकू यांच्या व्यसनाधीन गेले आहेत. नोकरी किंवा कोणताही रोजगार‌ नसल्याने त्याने दारू विकण्याचा मार्ग पत्करला. तरुण वर्ग हा व्यसनाधीन होऊन अवैध्य व्यवसायात गुंतला गेला. कारण‌ दारूचे व्यवसायात दिवसाला डबल कमाई होत असल्याने, आजचा तरुण पैशाच्या मोहात आपले भविष्यच बर्बाद करूण बसला. कांही शिकलेले विद्यार्थी अनेक नशिल्या शौकांना बळी पडून गांजा सारख्या नशिल्या वस्तुचे सेवन करतांना रात्रीच्या वेळेस गावशेजारील खुल्या मैदानात दिसत आहेत.तसेच दारू प्राशन करून‌, वाहन चालवितांना झालेल्या अपघातात‌ अनेकांना जिव‌ गमवावे लागले असुन, कांही गंभीर जखमी‌ झाल्याने अपंग‌ होऊन‌ बसलेत. याला जबाबदार प्रशासन व चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या कर्तव्याशी अप्रामाणिक अधिकारी आहेत.असे मत वृत्तसंस्थांसोबत संवाद साधताना मा. मनोहर पवार,संघटन मंत्री आम आदमी पार्टी (पूर्व विदर्भ)सिंदेवाही जि. चंद्रपूर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने