पोंभुर्णा मार्गावरील चिंतलधाबा जवळील घटना.
पोंभुर्णा:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार केमारा येथील शेतकरी रामपुर दिक्षित येथे धान चक्कीवर नेत असताना, गाडीवरून नियंत्रण सुटल्याने पोंभुर्णा मार्गावरील चिंतलधाबा जवळ धानाने भरलेला चार चाकी वाहन पलटले.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले. जखमी व्यक्तिना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व पुढील तपास पोलिस करीत आहेत.