भाजप कार्यकर्ते ची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती नगरपंचायतची होऊ घातलेली निवडणूक भाजप स्वबळावर लढविण्याची सर्व कार्यकर्त्यांनी मागणी मौजा जिवती येथे माजी आमदार संजय भाऊ धोटे यांना बोलून दाखवली.
मागील अनेक वर्षांपासून जिवती नगरपंचायत ची रखडलेले विकास कामे आदरणीय माजी वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी च्या सरकारने जिवती येथील नगर पंचायत भाजपा च्या ताब्यात आल्यानंतर अनेक प्रकारे अतिशय वेगाने विकास कामे करून दाखविले आहेत.
भाजप विकासावर विश्वास ठेवणारा पक्ष असल्याचे केलेल्या सर्व विकासवरून दिसुन येते आहे.
यामध्ये विशेषतः नगरपंचायत मध्ये 17 कोटींचा निधी आणून आत्तापर्यंत जवळपास सर्वच कामे पुर्ण झाले आहेत.
त्यात जीवती शहराला शुध्द पाणी (फिल्टर प्ल्यांट सह )चे काम सध्या सुरु आहे.शहारा अंतर्गत रस्ते ,नाली खबरस्तना, स्मशानभूमी,बगीचा,हैमास्ट, बाजार वटे, असे अनेक विकास कामे भाजपा नगर अध्यक्ष सौ.पुष्पाताई सोयाम व सोबत भाजपा चे अनेक नगरसेवक यांनी पाठपुरावा करून कामे करून दाखविली. भाजपा सरकारने नगर पंचायत चा चेहरा मोहरा बदलवून टाकला आहे.
सध्या जिवती शहरातील गरजु लाभार्थ्यांना घरकुल चा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या मुद्यांसाठी केंद्रशासना कडुन निधी आणून पुर्ण करण्याच्या द्रुष्टीने पून्हा एकदा भाजपा सत्तेत आणणे गरजेचे असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार केला आहे.
या निवडणुकीत सर्व 17 जागा निवडणूक लढविणार असल्याची कार्यकर्ते ची मागणी या सभेत उपसभापती महेश देवकते यांनी बोलून दाखविली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, जिल्हा संयोजक सुरेश केंद्रे , महामंत्री दत्ताजी राठोड, नगर अध्यक्ष सौ.पुष्पा नैताम, नगरसेविका सुनंदाबाई गोविंद राठोड ,नगरसेवीका सौ.अनुसायबाई राठोड,तुकाराम वारलावर, राजेश गोविंद राठोड, प्रल्हाद मदने , कुळसंगे मामा , गोविंद टोकरे, राजेश हरी राठोड, गोपीनाथ चव्हाण, दत्ता राठोड,अंकुश येमले, सुभाष पवार, पंढरी वाघमारे , बुधाजी मेश्राम , विजय गोतावळे, बनसी जाधव , फरीद शेख , दत्ता शिंदे , दौलत गेडाम , बालाजी माने ,सौ.विजयाताई चव्हाण ,सौ.श्रद्धा वडेट्टीवार,सौ.वर्षा गुरमे , सौ.वर्षाराणी सुनील जाधब व इतर भाजपा पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.