Top News

जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्रामीण रुग्णालय आणखी एकदा चर्चेत.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- गेल्या दोन ते तीन महिण्यापासून चिकनगुण्या च्या वाढत्या प्रकोपाने व चिकनगुण्या आटोक्यात न आणल्याने चर्चाचा विषय ठरलेलं पाटण येथील रुग्णालय आता चक्क रुग्णाच्या दुरअवस्थेमुळे, तर कधी डॉक्टरच वेळेवर उपस्थित नसतात या कारणाने, चर्चेचा विषय ठरत आहे.

       रुग्णालयाचा वेळ सकाळी 8 ते 12 हा असून सकाळी डॉक्टर 10 ते 11 च्या दरम्यान येऊन 12 वाजता परत दवाखाना बंद करतात, यासारखे प्रकार येथे आढळून येत आहेत. दिनांक 11/12/2020 रोजी पाटण ते टाटाकोहाड मार्गावर अपघात झाला रुग्णालयात रुग्ण पोहचला  तर काय डॉक्टरच उपलब्ध नसल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत होते. दवाखान्याने आणखी पुन्हा एकदा उंच झेप घेत होत्या नव्हत्या सर्वच सीमा रुग्णालयाने पार केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे स्थानिक मध्ये रुग्णालयाच करायच तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने