घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी ग्रा. पं सदस्य प्रभाकर चिकनकर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश.
चंद्रपूर:- घुग्घुस येथील शिवसेनेचे माजी ग्रा. पं सदस्य प्रभाकर चिकनकर यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व उपस्थित भाजपात प्रवेश घेतला.
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिवसेनेचे माजी ग्रापं सदस्य प्रभाकर चिकनकर यांचे भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
घुग्घुस ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी ग्रापं सदस्य प्रभाकर चिकनकर यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने घुग्घुस शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
नुकतेच घुग्घुस येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाआहे. घुग्घुस येथील शिवसेनेचे माजी ग्रापं सदस्य प्रभाकर चिकनकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश घेतल्याने घुग्घुस ग्रामपंचायतीचा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा माजी ग्रापं सदस्य सिनु इसारप, संजय तिवारी, साजन गोहने, वैशाली ढवस, पुजा दुर्गम, नंदा कांबळे, भाजपा नेते संजय भोंगळे, रत्नेश सिंग, हेमंत उरकुडे, श्रीकांत सावे, अजय आमटे, मल्लेश बल्ला, बबलु सातपुते, प्रविण सोदारी, निरंजन डंभारे, तुलसीदास ढवस, सुरेंद्र भोंगळे, दिलीप कांबळे, नितीन काळे, विवेक तिवारी, निरंजन नगराळे, राजेश मोरपाका, मनोज सरोज, मधुकर धांडे, मंगेश पचारे, सतिश कामतवार उपस्थित होते.