Top News

पोंभूर्णातील २७ ग्राम पंचायत मधील मतदार निवडणार आपआपल्या गावचे कारभारी.

सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर; ग्राम विकास विभागाचा फतवा
Bhairav Diwase. Dec 13, 2020


पोंभूर्णा:- कोणाच्या ध्यानी-मनी की स्वप्नी नसतांना अचानक ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जिल्ह्यातील ६२९ ग्राम पंचायतीसह पोंभूर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार असल्याने २७ ग्राम पंचायतीमधील प्रत्येक गावागावातील वातावरण ढवळून निघणार आहे. ऐन थंडीच्या मोसमात ग्राम पंचायतीच्या निवडणूका आल्या असल्या तरी त्या त्या गावचे वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र ग्राम विकास विभागाने ११ डिसेंबरलाच एक पत्र काढून माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुद्दत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्याची सुचना केल्याने सरपंच पदासाठी ईच्छूक असणाऱ्या चांगलीच पंचाईत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व सरपंच पदासाठीचा उमेदवार घोषीत करता येणार नसल्याने मतदारांनाही त्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

११ डिसेंबर रोजी राज्यातील १४ हजार २३४ ग्राम पंचायतीसोबत चंद्रपुर जिल्ह्यातील ६२९ व पोंभूर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायती साठी १५ जानेवारी ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीतील मतदारांना आपआपल्या गावात आपल्या आवडीचा गांव कारभारी निवडण्याची संधी मिळणार असुन त्यानिमीत्ताने आज पासुनच चर्चांचे गुऱ्हाळ सुरू झाल्याचे दिसत आहे.


आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकरीता नांमनिर्देशन पत्रासोबत जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. नांमनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्या असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिण्याच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तरीपण निवडणूक निकालानंतर कोण निवडून येईल व सरपंचाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होईल या दोन्ही गोष्टी निवडणूकीपूर्वी निश्चित नसल्याने, आणि निवडून दिलेल्या कारभाऱ्यांचा मुख्य कारभारी कोण होईल या संभ्रमातच मतदारांना मतदान करावे लागणार आहे. यापूर्वी निवडणूकीचे निकाल लागल्या दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी पळवापळवीचे कारस्थान व्हायचे, त्यावर आता लगाम लागेल, किंवा सरपंच पदाचे आरक्षण निघाल्यानंतर घोडेबाजार तेज होईल? हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी सरपंच आरक्षण सोडत निघायच्या दिवसांपर्यंत कोण कोणत्या ठिकाणी असेल याची काय शास्वती? पन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे ग्राम पंचायत कार्यालयावरील ध्वजारोहन नविन सरपंचाच्या हस्ते होईल एवढी आशा बाळगायला काय हरकत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने