भाजपाच्या मागणीला यश, बिबट्याला जेरबंद करण्याची केली होती मागणी.
ब्रम्हपुरी:- मागील काही दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव, डोर्ली, वांद्रा, आक्सापूर या परिसरात बिबट्याची दहशत वाढली होती. मागील एका आठवड्यात या नरभक्षक बिबट्या दोन महिलांना ठार मारले. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गावकरी संतप्त होते. या संदर्भात या परिसरातील ग्रामस्थांनी ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांची भेट घेतली होती.
या भेटी नंतर माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने ब्रम्हपुरी येथील वन अधिकारी श्री. म्हालोत्रा यांची भेट घेऊन या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. प्रसंगी वन अधिकारी श्री. म्हालोत्रा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले होते.
अखेर दोन दिवसांनी भाजपच्या मागणीला यश आले आहे. या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले. बिबट्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.