अतिरिक्त शुल्क वसुली प्रकरणात नारायणा विद्यालयम ला आदेश ७कोटी ५९लाख पालकांना परत करा.
वर्धा रोडवर असलेल्या चीचभवन परिसरातील नारायणा विद्यालयम ला शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अतिरीक्त शुल्क वसुली प्रकरणात 7 कोटी 59 लाख रुपये पालकांना परत करण्याचे निर्देश दिले आहे, या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
वर्ष 2017-18 ते 2019-20 या शैक्षणिक वर्षात पालकांकडून अतिरिक्त शुल्क म्हणून तब्बल 7 कोटी 59 लाखांची वसुली केली होती, जागरूक पालकांनी हे प्रकरण लावून धरत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना या प्रकरणाची तक्रार दिली होती, कडू यांनी शिक्षण विभागाला या प्रकरणी चौकशी लावून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नियमांपेक्षा अधिक शुल्क वसुली करण्यात आलेली रक्कम 1 महिन्याच्या आत परत करण्याचे निर्देश सुद्धा शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी नारायणा विद्यालयम ला दिले आहे.