बी टी-4 वाण देण्याची केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- माथा येथील अनेक शेतकरी आज तहसील कार्यालयात धडकला जगाचा पोशिंदा आणी अर्थव्यवस्थेचा कना मानाल्या जाणाऱ्या शेतकरी वर्गाची आजची स्थिती हि अत्यंत दैनिय झाली आहे. एकीकडे सरकार म्हणतात कि भारत कृषीप्रधान देश आहे परंतु याच कृषीप्रधान देशात शेतीचा खालावलेला दर्जा बघितला तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्या शिवाय राहत नाही आपल्याला माहित असेलच मागील वर्षापासून कपाशी या पिकाकर सतत बोण्ड अळीचा प्रादुर्भाव होतोय ज्या शेतकल्याने आपल्या पिकाला टिपनी पासुन ते बोण्ड धारण पर्यन्त एका छोटया बाळासारख जपल तेच पिक मोठ झाल्यानंतर त्यावर रोगाचा प्रादुर्भाव पाहुन डोळयात पाणी घेउन त्याच पिकावर ट्रॅक्टर चालविला जातो विचार करा काय अवस्था झाली असेल त्या शेतकर्याची कर्ज काडुन शेती सुद्धा मातीत गेली.
कसा करायचा आता कुटुंबाचा उदरनिर्वाह?
कशी करावी मुलाची स्वणे पुर्ण?
काय उत्तर द्याव त्या बँकेला?
वर्षानुवर्ष शेतकरी पारंपारीक पिके म्हणजेच कपासी, सोयाबीन, तुर, हरभरा, गहु, यासारखी पिके घेत आहेत दिवसेंदिवस जमीनींची उत्पादकता हि कमी होत आहे. आणि निसर्गाच्या लहरी पणामुळे उत्पादनामध्ये सुध्दा घट होत आहे. मिळालेल्या तुटपुज्या उत्पादनाला योग्य तो भाव मिळत नाही . भारत हा कृषीप्रधान देश आहे असे आपन म्हणतो पण जगात बि टी - 6 वाण असताना मात्र भारतात अजुनहीं बि टी-2 चाच वापर होतो असे का ? या कम्पन्या म्हणतात की , आम्हच्याकडे बिटी-4 तयार आहेत . पण सरकार परवाणगी देत नाही. मग या विषयावर कोणताच नेता किंवा अधिकारी काहीच बोलत नाही.
तरी शासनस्तरावरून कपाशीचे सुधारित वाण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली या वेळेस शशिकांत अडकीने, किशोर कोहळे,सुनील आमने, गजानन बेरड, संतोष वांढरे, आकाश शेंडे, असे अणेक शेतकरी उपस्थित होते.