कान्हारगाव अभयारण्य रद्द करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धीरज बांबोडे यांची मागणी.

Bhairav Diwase. Dec 17, 2020
चंद्रपूर:- बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर, कामगार व वंचित बहुजन आघाडी तसेच संपूर्ण जनतेकडून कान्हारगाव गावातील अभयारण्य रद्द करण्यास यावे. या तालुक्यातील परिसर अनेक पेढ्या पासून वास्तव्य तसेच शेती व लगतच्या जंगलावर व्यवसायावर व मजुरीवर अवलंबून असल्यास जंगलाचे वन्य प्राण्यांचे तृणभक्षी प्राण्यांचे रक्षण करीत आहे. जंगल डोलाने उभा आहे व तसेच या क्षेत्रातील त्यामुळे वन्य प्राण्यांचे शिकार व जंगलतोडीचे प्रमाण मुळीच नाही.

         वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कन्हारगाव, धरण, धाबा, लोहगाव वनक्षेत्राचा 269 चौ कि.मीक्षेत्र अभयारण्य आरक्षित करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे आभार येण्या म्हणून प्रास्ताविक वनक्षेत्राचा परिसर अभयारण्य आरक्षित केल्यास तालुक्यातील ४२१४४ लोकसंख्याची ३२ गावे व दररोज २७०० ते २८०० शेती व जंगलाच्या कामावर अवलंबून असल्यामुळे या परिसरातील ४२१४४ जनातेला व वरिष्ठ प्राण्यांना जंगलात जाण्या-येण्याचा प्रश्न व शेतकऱ्यांना आवश्यक असणारे अवजारे व सुविधांचा अधिकार नाश्ता व संपुष्टात होणार अभयारण्य झाला त्या परिसरातील गोरगरीब, शेतकरी व शेतमजूर आदिवासी, जनताच्या हातात येणार नसून त्यांचा उदरनिर्वाहाचे गंभीर समस्या होणार याकरिता कान्हा र गाव अभयारण्य रद्द करण्याचे निवेदन शासनाकडे केले आहे. अन्यथा मोर्चा व आमरण उपोषण व आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने