भद्रावती:- यशवंतनगर पडोली येथील वैदेही जुगलकिशोर लोया या विद्यार्थिनीने 'नीट' परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या हस्ते नुकताच तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा शाल,सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई माणुसमारे, तालुका महामंत्री विजय आगरे, दुर्गा बावणे, उपाध्यक्ष अजय चार्लेकर,सचिव विनोद खडसे, मोरेश्वर माणुसमारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
वैदेहीने अलिकडेच दिलेल्या वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा 'नीट' मध्ये ७२० पैकी ६६४ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले. तसेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत तीने ९४.५ टक्के गुण मिळवून उंच भरारी घेतली. विशेष म्हणजे वैदेहीचे वडील चंद्रपूर-नागपूर मार्गावर पडोली येथे छोटीशी चहाटपरी चालवितात. एका सामान्य चहाविक्रेत्याच्या मुलीने शिक्षणक्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक केले जात आहे.