ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घटना घडल्याने विविध चर्चाना उधाण.
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे काल विषाटी दारू पिल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 8 जण अत्यवस्थ झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रकाश फकिरा गौरकार वय वर्ष 53 रा. लक्ष्मणपूर ता. चामोर्शी जि. गडचिरोली, रमेश नानाजी ढुमने वय वर्ष 52 रा लक्ष्मणपूर ता. चामोर्शी जि. गडचिटोली अशी मृतकाची नावे आहेत.
तर 8 जण अत्यवस्थ आहेत. त्यांना आष्टी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामध्ये बालाजी नारायण डवले, श्यामराव काशिनाथ गौरकार, राजू काशीनाथ गौरकार, गंगाधर नानाजी देव्हारे, बापूजी गोविंदा नांदेकर सर्व रा. लक्ष्मणपूर अशी अत्यवस्थ रुग्णाची नावे आहेत.
काल लक्ष्मणपूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान होते. त्या पार्श्वभूमीवर किमान काही जण ही दारू पिल्याचे सांगण्यात येत आहे. त्या सर्वांना काल सायंकाळी अत्यवस्थ वाटू लागल्याने आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी विषारी दारुची फार मोठ्या प्रमाणात अवैधरित्या केली जाते. ऐन मतदानाच्या दिवशी अशी घटना घडल्याने विविध तर्काना उधाण आले आहे.