माना जमातीचा ऑनलाईन उपवर-वधू परिचय मेळावा ३१ रोजी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने या वर्षी प्रथमच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उपवधू -वर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ 31 जाने.ला नाग नगरीत आयोजित करण्यात आले आहे.

      या करिता फरवरी /मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या व बारावीच्या परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्यांनी आपली गुणपत्रिका मोबाईल क्रमांकसह 8087274843 अमोल हनवते यांच्या व्हॉट्सअपवर पाठवावी उपवर वधूनी नाव शिक्षण जन्मतारीख उंची, वर्ण, व्यवसाय, मामेकुळ व संपूर्ण पत्ता मोबाईलसह 9096165258 हा क्रमांक देविदास जांभूळे यांच्या व्हॉट्सअप ला पाठवावी. तसेच संजय गायकवाड यांच्या 20060934145 या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भद्रावती (IFSC coad MAHB 0000181) या खात्यावर वर्गणी देणगी जमा करावी.
      
  या कार्यक्रमाला केवळ निवड झालेले विदयार्थी आणि परिचय देणाऱ्या वर वधू यांना पालकांसह प्रवेश देण्यात येणार आहे. इतर सर्व समाजबांधवांनी दिलेल्या लिंकवर घरी बसून राहूनच कार्यक्रम पहावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड, शंकरराव गरमडे, देविदास जांभुळे, देवराव घरत, किशोर चिकटे, पुरुषोत्तम घोडमारे, राजू चौधरी, रूपचंद धारने, शामराव दांडेकर, अमोल हनवते, दामोदर दोहतरे, श्रीकांत वाकडे यांनी केले आहे.