उखाणे व गीतगायन स्पर्धेतुन कलागुणांना वाव.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- मकरसंक्रांतीचे निमित्त साधून श्री संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज महिला कार्यकारिणी मंडळाकडून महिलांचा हळदीकुंकू, उखाणे व गीतगायन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. काल (दि. 20 ) श्री संत गाडगेबाबा समाजभवन, रामपूर ता. राजुरा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षिका तथा समाजसेविका कृतिका सोनटक्के, जिल्हा कार्यकारिणी सचिव नंदिनी चुनारकर यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षा संगीता दुरुडकर यांची प्रामुख्याने उपस्थित होती. प्रसंगी समाजातील महिलांसाठी उखाणे व गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या कलांना उजागर केले. उपस्थित महिलांना हळदीकुंकू करून वाणांचे (भेटवस्तू) वाटप करण्यात आले.
महिलांनी सामाजिक कार्यक्रमातून प्रगती साधून समाजहिताचे व देशाच्या कार्यात आपले योगदान द्यावे, आज महिलांनी ठरवलं तर काहीही साध्य करता येऊ शकते, याचा आपल्या सर्वांना अनुभव आहे. त्यामुळं महिलांनी अशा कार्यक्रमातुन पुढे येण्याचे आवाहन कृतिका सोनटक्के यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
स्नेहमीलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री पवनकर, रविता केळझळकर, मीरा ताजने, शरयू वाघमारे, प्रतिभा तुराणकर, स्वाती बोबडे, अश्विनी श्रीकोंडावार, वैशाली धानोरकर, शितल लोणारे, विजया चिंचोलकर, भावना भोयर, ममता श्रीकोंडावार, कौशल्या चिंचोलकर, शारदा बंडेवार आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जयश्री पवनकर यांनी मानले.