जळगाव:- पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर 37 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडिताच्या मातेने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही आरोपीने असा गुन्हा केला होता. त्यामुळे या गुन्ह्यातही त्याला शिक्षा झाली आहे. याप्रकरणी जेलमधून सुटल्यावर नराधम संदीप तिरमलीने पुन्हा 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला.
या चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर संदीप तिरमली हा नराधम हावडा एक्सप्रेसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यावेळी हावडा एक्सप्रेसमधून पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पथकाने सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या.