Top News

भद्रावती तालुक्यात ६५.३४ टक्के मतदान.

घोडपेठ आणि टाकळी येथे मारहाणीच्या घटना.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दि.१५ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भद्रावती तालुक्यात ६५.३४ टक्के मतदान झाले असून घोडपेठ आणि टाकळी गावात मारहाणीच्या घटना घडल्याने निवडणुकीला गालबोट लागले. 
            
      तालुक्यात ५३ ग्राम पंचायतींमध्ये १८८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.त्यात घोडपेठ आणि टाकळी या ग्रामपंचायती वगळता सर्व ग्राम पंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले.
                
      घोडपेठ येथील वार्ड क्र.२ मधील उमेदवार दिलीप शंकर साव (४८) यांनी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात दुस-या उमेदवाराने टेबल लावले म्हणून आक्षेप घेतला व त्याचे टेबल हटवायला लावले. त्यामुळे त्या उमेदवाराने चिडून जाऊन आपल्या चार साथीदारांसह साव यांना मारहाण केली.या घटनेची त्यांनी तहसीलदार व ठाणेदाराकडे तक्रार दाखल केली आहे. तर, टाकळी येथे मत्ते परिवारातील ३ सदस्यांना त्याच गावातील काही नागरिकांनी वाद घालून भर चौकात मारहाण केली. या दोन्ही घटनांची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने