भद्रावती:- भद्रावती विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार आणि भद्रावती शिक्षण संस्थेचे सचिव निळकंठराव यशवंतराव शिंदे यांचे आज दि.१४ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
मृत्यूसमयी ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. ते सन १९७८ मध्ये भद्रावती क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भद्रावती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भद्रावती तालुक्यात प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोठे जाळे तयार केले होते.त्यांच्यावर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.