Top News

श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती येथे पार पडला राष्ट्रसंतांचा ऑनलाईन पुण्यतिथी महोत्सव.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमाने नावीन्यपूर्ण पद्धतीत श्री गुरुदेव टीव्ही या युट्यूब चैनल वर लाखोंच्या ऑनलाइन उपस्थित उस्फूर्तपणे संपन्न झाला.

      श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन शेषानंद पांडे महाराज यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी 'राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धा' तसेच गरीब व गरजूंना घरपोच ब्लँकेटचे वाटप करण्यात येऊन दिवंगत कार्यकर्त्यांना श्रंध्दाजंली वाहण्यात आली .

       आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा परिसंवाद घेण्यात आला व यामध्ये १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ग्रामगीतेतील अध्याय 'जीवनकला व ग्राम आरोग्य' यावर आपले चिंतन प्रकट केले. पौर्णिमाताई सवाई यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलन संपन्न झाले. कु. साक्षी अतकरे बाल कीर्तनकार यांचे कीर्तनाने संमेलनाची सुरुवात होऊन कार्यक्रम प्रसंगी निर्मलाताई खडतकर ,प्रेमिलाताई पिंपळकर , कविताताई येणुरकर, उर्मिलाताई बोंडे , कु. मोनाली बतकी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा पिंपळकर व आभार उषाताई आखाडे यांनी मानले.

     कार्यक्रम प्रसंगी झालेल्या राष्ट्रसंत व्याख्यानमालेत आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरूजी यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला गरज असून ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले तसेच ह.भ.प. निंबाजी महाराज तागड व संच नागपूर यांनी भारुडाचा कार्यक्रम व मानव सेवा छात्रालय, गुरुकुंज आश्रम यांनी 'स्वर गुरुकुंजाचे' हा संगीतमय कार्यक्रम सादर केला.

    कार्यक्रमप्रसंगी सुरक्षा नगर परिसरात रामधून काढण्यात येऊन यानिमित्ताने परिसरात साफसफाई करून मार्गावर राष्ट्रसंतांच्या प्रतिमा व रांगोळ्याने मार्ग सुशोभित करण्यात आले. याप्रसंगी हभप मनोज महाराज चौबे यांनी रामधुनच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले तसेच सामुदायिक ध्यान व प्रार्थनेच्या महत्त्वावर अरविंद राठोड, नामदेव गव्हाळे महाराज यांनी चिंतन प्रकट केले .ह भ प सुनिल महाराज लांजुळकर यांनी गोपाल काल्याचे किर्तन सादर केले. याप्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सेवकरामजी मिलमिले, चंद्रकांतजी गुंडावार, केशवानंद मेश्राम महाराज यांनी मार्गदर्शन केले.

     संस्कृती संवर्धन व आदर्श पिढी घडविण्याच्या हेतूने मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या बाल सुसंस्कार व प्रचार प्रशिक्षण शिबिरा करिता 'शाश्वत निधी योजनेत' स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुणवंत विनायक कुत्तरमारे यांनी रुपये ५० हजार (रुपये १ लाख संकल्पित) धनादेश मंडळाला सुपुर्द केला . विशाल जगन्नाथ गावंडे यांनी रुपये ५० हजार व मंडळाचे अध्यक्ष हभप केशवानंद मेश्राम महाराज यांनी प्रतिवर्ष रुपये १० हजार याप्रमाणे रुपये ५० हजाराचा संकल्प केला.

   पुण्यतिथी महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या 'राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेत' पहिल्या गटात भीष्मा भैसारे, पूर्णा गोहने,दुसऱ्या गटात पर्णवी, ओजस बोढाले, गुंजन शिवरकर तिसर्‍या गटात निशा प्रसाद,साक्षी सहारे, सौ. तेजस्विनी डंभारे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण शालीक दानव, क्षितीज शिवरकर व विनोद ठमके सर यांनी केले. 

    कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुरलीधर मेश्राम, गोपीचंद मेश्राम, झनक चौधरी, बालाजी नागपुरे, पुरुषोत्तम मत्ते, मारोती कोरेवार, नरेंद्र मेश्राम, गजानन डंभारे, कालीदास चेडे, तुकाराम उमाटे, खुशाल कंचनवार, अरुण मुरकुटे,अशोक गौरकार,भुजंगराव खानोरकर, विवेक महाकाळकर, शोभाताई खडसे, निलिमाताई वासेकर, आशाताई शेंडे, गजानन ढेंगळे, बाबाराव तेलरांधे, रमेश धाबेकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने