भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती.
चंद्रपूर:- रविवारला घुग्गुस येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.
घुग्गुस प्रा.आ.केंद्रा अंतर्गत घुग्गुस नगरात 0 ते 5 वर्षे वयोगटाच्या 2,561 बालकांना पोलिओ लस देण्याकरिता 25 केंद्र स्थापन करण्यात आली आहे तर समाविष्ट असलेल्या 15 गावातील 3,749 बालकांना पोलिओ लस देण्याकरिता 44 केंद्र स्थापन करण्यात आली आहे.
घुग्गुस प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर वाकदकर,अर्चना वाकदकर, सुजाता गुप्ता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होते.