सावली:- सावली तालुकातील निलसनी पेढगाव येथुन रोज पहाटे सुरू होणारी अवैध रेती ची वाहतूक थांबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनानं कडे अनेकदा केली होती पन प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे मोठ्या प्रमानात अवैध्य रेती सुरु दिवस रात्र सुरु असल्याने गावकरी कटाळुन अखेर गावकरी यानी समोर चक्क गावातच टक्टर पकडुन प्रशासनाला सुप्रत नामा केले असल्याने मोठी खळबळ माजली आहे आह निलसनी पेठगाव येथे रात्रौ पासून सुरू होणारी अवैध रेती ची वाहतूक अखेर गावकऱ्यांनी समोर येऊन पकडल्याने खळबळ माजली आहे.सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव या गावाची सीमा ही वैनगंगा नदीची आहे.
खनिज संपत्ती ने विपुल असलेल्या या घाटावरून सद्या काही रेतीचे ट्रॅक्टर हे रात्रीच्या सुमारास अवैध रेती ची वाहतूक करतात. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा माहिती दिली मात्र पकडण्यात आलेले नव्हते अखेर आज गावकऱ्यांनी या रोज च्या त्रासापाई अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून ठेवले व प्रशासनाला सूचना दिली.तसेच ट्रॅक्टर पळून जाऊ नये गावकरी यांनी ट्रक्टर चे रक्षण केले व आज सकाळी ११ वाजता तलाठी एस.एच.घोगरे यांनी बयाण नोंदवीत ट्रॅक्टर जप्त केली आहे.सद्या निलसनी पेठगाव, भांसी व परिसरात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ असून या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. समोर का कार्यवाही करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.