(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींच्या उपस्थितीत जन विकास सेनेतर्फे चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे आयोजीत पोलीस-आर्मी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण शिबिराचे वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक श्री.आभासचंद्र सिंह यांचे हस्ते दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक श्रीराम तोडासे, प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक उत्थान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ डांगे व सचिव हरीश गाडे,श्रीमती सितादेवी जम्पलवार,माजी सुभेदार प्रभाकर जांभुळकर ,फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे,स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक स्वप्नपूर्ती अकॅडमीचे संचालक सुरज उराडे,स्पर्धा परीक्षा प्रशिक्षक व समुपदेशक अनिल दहागावकर, वासनिक सर अकॅडमीचे संचालक संजय वासनिक,श्रीराम स्पोर्टस्चे संचालक संदिप वाढई उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता जन विकास सेनेचे प्रफुल बैरम, राहुल दडमल, अक्षय येरगुडे,गोलु दखने,नामदेव पिपरे,मोंटू कातकर,गितेश शेंडे,मनीषा बोबडे,निर्मला नगराळे,घनशाम येरगुडे,देवराव हटवार,दिनेश कंपु,इमदाद शेख,आकाश लोडे,अमोल घोडमारे सतिश येंसाबरे, भाग्यश्री मुधोळकर,सुनयना क्षिरसागर,निलेश पाझारे, धर्मेंद्र शेंडे, सुनील थेरे, प्रकाश कांबळे,शालीनीताई थेरे, मंगलाताई कांबळे,रमा देशमुख यांनी अथक प्रयत्न केले.या प्रशिक्षण शिबिरांमध्ये चंद्रपुरातील प्रसिद्ध फिजिकल ट्रेनर रोशन भुजाडे तसेच स्वप्नपूर्ती अकॅडमीचे स्पर्धा परीक्षेमध्ये तज्ञ असलेले सुरज उरकुडे हे शारीरिक व लेखी मार्गदर्शन करणार आहेत. अनिल दहागांवकर यांच्यातर्फे दर हप्त्याला शैक्षणिक व मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे.