गडचांदूर चे बेरोजगार प्रोडक्शन शॉर्ट फिल्म निर्माते व्हिडिओ द्वारे ठरत आहे मानवी जीवनात घडत असलेल्या गोष्टी साठी आदर्श.

Bhairav Diwase
गडचांदूर परिसर बनत आहे शॉर्ट फिल्म चे माहेर घर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- साधारण कलाकार, कलावंत ते चित्रपट निर्मिती हा थक्क करणारा प्रवास असतो हे आपल्याला पाहायला मिळत असते पण मात्र तरुण युवा विदयार्थी हे लोकांसमोर दाखवतात तेव्हा खूप मन प्रसन्न होऊन जाते की आपल्यातला कोणीतरी स्टेज वर आपली मंडळी आहे मनोरंजन करीत हसवत आहे. आणि तशीच ही मंडळी गडचांदूर येथील बेरोजगार प्रोडक्शन शॉर्ट फिल्म निर्माते त्यांच्या अंगी कलागुणांना वाव देऊन ते लोकांसमोर काॅमेडी शॉर्ट व्हिडिओ द्वारे आपली कला दाखवीत आज उच्च स्तरावर पोहोचत आहे.

       मग ते हास्य चित्रीकरण असो की मग एखाद्या कॉलेज जीवनावर अतिशय चांगल्या प्रकारे हास्य प्रदर्शित करुन लोकांना आकर्षित करीत आहे.. आणि त्यातलीच एक महिला छळ (women Harrassment) वर आधारित "धाडस" ही शॉर्ट फिल्म अतिशय मार्मिक पणा या शॉर्ट फिल्म मधे दाखवलेला आहे. महिलांचा आदर आणि त्यांचा मानसन्मान करायला पाहिजे. एखादी व्यक्ती अपंग असेल तर माणूस त्या प्रकाराचे कृत्य का घडवून आणतो हा मोठा प्रश्न जनतेस मांडला आहे. याचा महिला बद्दल असलेले वाईट विचार मानवांची नजर हि वाईट प्रवृत्तीची का झालेली आहे? हे या फिल्म मध्ये सांगितलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
       
बेरोजगार प्रोडक्शन हे पुढील काळात काय काय कश्याप्रकारे घडू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व विचारांचा भार घेणारे प्रोडक्शन चे स्क्रिप्ट राईटर विजय डायले आणि तसेच त्यांच्या सोबत असलेले सर्व कलाकार अतिशय मेहनत घेत आहे. मानवी जीवनात होत असलेल्या घडामोडी लोकापर्यंत कसे पोहचवता या प्रयत्नात हि संपूर्ण टीम आहे 

पुढील वाटचालीस या टीम ला मंगलमय शुभेच्छा.....