पोंभुर्णा तालुक्यात ८३.४२ टक्के मतदान.

Bhairav Diwase
तालुक्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान.
Bhairav Diwase. Jan 17, 2021


पोंभुर्णा:- दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत महाराष्ट्रात पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. पोंभुर्णा तालुक्यात ८३.४२ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागाच्या विकाससाठी निगडीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शांततापूर्ण वातावरणात उत्साही मतदान झाले


     भारत निवडणुक आयोगाने तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीसाठी इच्छूकांनी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत फारसा उत्साह दिसला नसला तरी त्यानंतर मात्र मतदानाने वेग घेतला. सकाळी गावागावातील विविध पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते सुध्दा मतदान केंद्रांपर्यंत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पोंभुर्णा तालुक्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. 
     
   गावकारभारी निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले असून उमेदवारांचा निकाल सोमवारी लागणार आहे. त्यामुळे २७ ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. सोमवार दि. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी तालुकास्तरावर होणार आहे.