स्नेहभाव मैत्री व समतेचा संदेश देणारा मकरसंक्रमण उत्सव:- गुरुदास कामडी.
चंद्रपूर:- मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण आहे.हदक्षिण भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या दिवशी मकरसंक्रांत साजरी केली जाते. सूर्याचे 14 जानेवारीला धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते या दिवसापासून दिवस मोठा व रात्र रात्र लहान होत असते . म्हणूनच मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो मकरसंक्रांती बरोबर 14 जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो . सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या हा काळ एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिन्यात त्याचा प्रवास सुरू असतो . 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकर संक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. मकर संक्रांत उत्सव अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा पर्व आहे. तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस भूगोल दिन म्हणून आज आपण साजरा करीत आहोत. असे प्रतिपादन प्रमुख वक्ता गुरुदास
कामडी यांनी दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर द्वारे आयोजित मकरसंक्राती उत्सव जागतिक भूगोल दिन ऑनलाइन व्याख्यानात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन पाठक होते. 16 जानेवारी 2019 रोजी सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे मकरसंक्रांत जागतिक दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गुरुदास कामडी होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र सैनिक विद्यालयाचे शिक्षक मोहन पाठक प्रमुख उपस्थितीत प्राचार्य कु. अरुंधती कावडकर होत्या.कार्यक्रमाची सुरुवात भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून इयत्ता दहावीतील विद्यार्थी मनोज पाचभाई यांच्या हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसा सम वागणे.
या गीताने करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने पतंगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते बारावीच्या दोन गटात पतंग उत्सव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सहावी ते आठवी या गटातून प्रथम क्रमांक इयत्ता सहावीतील शौर्य रंगारी द्वितीय क्रमांक इयत्ता आठवी हर्षद पिंपळापूरे तृतीय क्रमांक स्वरूप लखमापूर यांनी प्राप्त केला तर इयत्ता नववी ते बारावी या गटातून प्रथम क्रमांक सम्यक वाकडे यांनी प्राप्त केला . या चित्रकला स्पर्धेचे आयोजन व परीक्षण संजय देशपांडे श्रीकांत कुमरे यांनी केले याप्रसंगी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय व सूत्रसंचालन सौ.रोशनी तडवी आभार ज्ञानेश्वर शेगोकर यांनी केले.