पुरोगामी पत्रकार संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Bhairav Diwase
सत्कार मूर्ती प्रा. जयश्री नागापुरे यांनी कोविड 19 च्या कालावधी मध्ये मोफत युट्युब च्या सानिध्यातून 11 वि तसेच 12 विच्या मुलांना दिले शिक्षणाचे धडे.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही येथे पुरोगामी पत्रकार संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आता स्त्रियांनी गावाला आदर्श करण्यासाठी पुढे यावं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी हाल अपेष्टा सहन करत स्त्री शिक्षणाचे बीज रोवले त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र मधील महिलांनी कुटूंबाचा सुद्धा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन सत्कार मूर्ती प्रा. जयश्री नागपुरे यांनी केले.

      तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सिंदेवाही नगरपंचायतचे नगराध्यश्या सौ. माडकवरयांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना म्हटले कि स्त्री हि केवढं सावित्री बाई फुले यांच्या मुळेच आज समोर आलेली आहे व शिक्षणात मोलाचे स्थान महिला वर्गाना त्यांच्यामुळेच प्राप्त झालेला आहे . लोणवाही ग्रामपंच्यातचे ग्रामसेविका सौ. बन्सोड मॅडम यांनी अनेक स्त्रियांना मिळणारे अधिकार आपल्या बोलण्यातून प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. मडकवर मॅडम ,प्रमुख पाहुणे ग्रामसेवक सौ मीनाक्षी बन्सोड मॅडम,सत्कार मूर्ती प्रा. कु जयश्री नागपुरे मॅडम. तसेच भगवंत पोपटे अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही तथा आक्रोश खोब्रागडे, कुणाल उंदिरवाडे, विरेंद्र का. मेश्राम, प्रशांत गेडाम,भुवन बोरकर, अमोल निनावे हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आक्रोश खोब्रागडे आणि आभारप्रदर्शन कुणाल उंदीरवाडे यांनी केले.