महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा राजुरा तर्फे पत्रकार दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा तथा जेष्ठ पत्रकारांचा सत्कार.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण देशात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ-मुंबई शाखा राजुराचा वतीने दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा दि. 6 जानेवारी 2021 रोज बुधवारला पत्रकार दिनानिमित्त राजुरा तालुक्यातील सामाजिक कार्यात आपले महत्वाचे योगदान देणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा तथा जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
        त्यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून नगर परिषद राजुरा येथील दोन महिला सफाई कामगार, ग्रामीण रुग्णालय राजुरा येथील दोन सफाई कामगार, वृत्तपत्रे वितरण ( वाटप ) करणारे दोन युवक तसेच दोन ज्येष्ठ पत्रकार यांचा समावेश आहे.
              त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राजुराचे अध्यक्ष मा. प्रा. अनंत डोंगे, सचिव राहुल थोरात, कार्याध्यक्ष रत्नाकर पायपरे, उपाध्यक्ष उज्वल भटारकर, प्रविण मेकर्तीवार, सहसचिव ओंकार आस्वले, ता. संघटक संतोष देरकर, कोषाध्यक्ष वैभव धोटे, प्रसिद्धी प्रमुख संतोष मेश्राम, जिल्हा प्रतिनिधी आदित्य भाके, प्रेस फोटोग्राफर रुपेश वाटेकर, कैलास कार्लेकर, संजय रामटेके, अंकुश भोंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.