नारंडा येथे भाजपा तर्फे कोरपना तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले असून अनेक गावात स्वबळावर व काही गावात मित्रपक्षांसोबत बहुमत प्राप्त झाले आहे.१७ ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत,त्याच अनुषंगाने नारंडा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
भारतीय जनता पक्षाला राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी घवघवीत यश प्राप्त झाले असुन जवळपास ५० ग्रामपंचायतमध्ये भाजपा व युतीमध्ये सत्ता स्थापन होणार आहे.त्याचप्रमाणे कोरपना तालुक्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे,ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा कणा आहे,त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी जागृक राहून कार्य केले पाहिजे व त्यांच्यावर गावातील नागरिकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला पाहिजे त्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी जनसेवेचे व्रत घेऊन कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी केले.
यावेळी मंचावर निलेश ताजने, भाजपाशहर अध्यक्ष सतीश उपलंचेवार, संजय मुसळे, रमेश पाटील मालेकर, अँड. अर्पित धोटे माजी सरपंच वसंतराव ताजने, वासुदेव आवारी, कान्हाळगावचे सरपंच विनोद नवले, सुरेश पाटील परसुटकर,नागोबा उरकुडे,मारोती बोबडे उपस्थित होते.
कोरपना तालुक्यातील बहुचर्चित सर्वांचे लक्ष लागून असलेली नारंडा येथील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ९ पैकी ७ उमेदवार निवडून आले असून स्वबळावर बहुमत प्राप्त झाले आहेत.तसेच लोणी,शेरज खुर्द,नोकरी या गावात सुद्धा भाजपाने स्वबळावर बहुमत सिद्ध केले आहेत,तसेच युतीमध्ये कोडशी खुर्द,पिपरी,कढोली,सांगोडा,भारोसा येथे बहुमत प्राप्त झाले आहेत.यावेळी प्रास्ताविक भाषण भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच भोयगाव येथील मारोती पाचभाई, दत्तू वांढरे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.यावेळी कोरपना तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण हेपट, व आभार प्रदर्शन अरुण निरे यांनी केले.