भद्रावती नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी संतोष आमने अविरोध निवड.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या आज दि.५ जानेवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीत नगरसेवक संतोष आमने यांची अविरोध निवड करण्यात आली. 

     मावळते उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी काही दिवसांपूर्वी वयक्तिक कारणांमुळे आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर दि.३१ डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. त्यात संतोष आमने यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाला होता.आज दि.५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली न.प.सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला स्वत: नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक उपस्थित होते. १२ वाजून ५ मिनिटांनी सभेचे कामकाज सुरु झाले. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी संतोष आमने यांचाच एकमेव नामनिर्देशनपत्र आल्याने व त्यांच्या विरोधात कोणाचाही उमेदवारी अर्ज नसल्याने आमने यांना अविरोध निवडून आल्याचे सभेचे अध्यक्ष तथा पिठासिन अधिकारी अनिल धानोरकर यांनी जाहिर केले. त्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

  यावेळी मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, उपमुख्याधिकारी गायकवाड आणि न.प. कर्मचारी उपस्थित होते.