Top News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेने फुंकले रणशिंग.

Bhairav Diwase. Jan 05, 2021

पोंभूर्णा:- कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून बघितल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने उडी मारली असून, राजकारणाचा पाया म्हणून पाहल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घालून शिवसेनेचे सदस्य अधिक कसे होतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी गावगाळ्यात बैठका सुरु केले आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री यांच्या सूचने नुसार मुंबई वरुन शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत करिता थेट गावा-गावात जाऊन बैठका घेतल्या. काल चेक बल्लारपुर, आष्टा, सोनापुर, फुटणा, थेरगाव, दिघोरी, केमारा, देवाडा, घनोटी, विहिरगाव व आदी गावात बैठका घेऊन शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणूकीत उडी मारली आहे.


      ग्रामपंचायत मध्ये पक्षाचा सक्रिय सहभाग कमी असतो. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, याची काळजी खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य घेत असतात. मात्र यावेळी तालुक्यात होत असलेल्या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने अधिक रस घेतल्याचे समोर येत असून,३ जानेवारी रोजी खुद्द मुंबई वरुन शिवसेनेचे नेते यांनी यासंदर्भाने बैठक घेऊन अधिकाधिक ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे कसे वर्चस्व राहील या मुद्द्यावर मंथन केले.
      
    यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, आशिष कावटवार, गणेश वासलवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवेसना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिक गांभिर्याने घेतल्या असून, या माध्यमातून शिवसेनेचे ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्यासोबतच संघटनात्मक बांधणीसाठीही या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेचे प्राबल्य वाढविण्यासाठी या निवडणुका अधिक गांभीर्याने घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख गिर्हे यांनीही मार्गदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने