चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवा यासाठी तहसीलदार यांना युवा स्वाभिमान पार्टी तर्फे निवेदन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील २०११ साली तत्कालीन मंत्री संजय देवतळे यांच्या अहवालावरून युती शासनाने २०१५ पासून चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित केला त्यामुळे गेल्या ४ वर्षात  अवैध व्यवसायाला आळा  बसून जिल्ह्यामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ता बदल होताच महाविकास आघाडी शासनाने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हाभर दारू सुरु होणार अशी वल्गना केल्याने अवैध व्यवसायकांचे डोकेवर निघून शहरी व ग्रामीण भागात बस्तान बसवून जिल्हाभर पोलीस प्रशासन डोळे झाक करीत मूक सहमती दिली कि काय? असे वातावरण झाल्याने नव्याने महिला अत्याचार कौटुंबिक हिंसा मंदावल्या होत्या.


       लाखो महिलांच्या भावना दारूबंदीच्या समर्थनार्थ असतांना राजकीय लाभ घेण्यासाठी उठाठेव केली जात आहे.अनेक ग्रामसभा, महिला समिती, सामाजिक संघटना, यांचा दारू दुकाने सुरु करण्यास प्रखर विरोध आहे. जिल्ह्यातील परिस्तिथी लक्ष्यात घेता शासनाने व्यवसायावर आळा घालण्यासाठी कठोर कायदा दुरुस्ती करावा. मंत्रिमंडळ समितीने चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी १३ सदस्यीय समिती नेमणूक केली शासकीय व अशासकीय समिती सदस्यांनी जनतेचा अनादर न होवू देता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी यासाठी युवा स्वाभिमान पार्टी कोरपना च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 
       
      त्यावेळी तालुका अध्यक्ष मोहब्बत खान, प्रशांत घुन्ग्रुड, नदीम अली, प्रमोद गिरडकर, शहेबाज अली, पवन बुरेवार,  आदि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दारूबंदीचा निर्णय फेरबदल केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा ४०० महिलांच्या निवेदनातून देण्यात आला आहे.