Top News

भद्रावती शहरातील साईमंदिरात कोविडमुळे बंद पडलेली महाप्रसाद वितरणाची प्रथा परत सुरू.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील बगडे वाडी येथील साई मंदिरात कोविडमुळे बंद पडलेली महाप्रसाद वितरणाची प्रथा स्थानिक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुढाकाराने पुन्हा सुरु करण्यात आली. 
            पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शाम चटपल्लीवार यांनी गुरुवारी साईमंदिरात महाप्रसादाचे वितरण करून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांचे या कार्यक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
            यावेळी साईमंदिराचे विश्वस्त अनिल बगडे, गोपाल ठेंगणे सर,श्रीहरी बगडे, प्रकाश बगडे,विनायक माणुसमारे, पिंपळकर, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याद्यापक पांडुरंग बदकी सर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भद्रावतीचे कार्यकारणी सदस्य रुपचंद धारने सर, शंकर बोरघरे, अब्बास अजानी, अशोक पोतदार, ईश्वर शर्मा, जावेद शेख, महेश निमसटकर, सुनील पतरंगे, सुनील दैदावार, सुनील बिपटे, प्रदीप मडावी, विनोद ठाकरे, पवन शिवणकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे आदी मान्यवर मंदीरातील कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
          
  सदर मंदिरात दर गुरुवारी साईभक्तांकडून त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे महाप्रसादाचे वितरण केले जात होते. मंदिर निर्मितीपासून ही प्रथा येथे अविरतपणे सुरू होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या दहा महीन्यांपासून ही प्रथा बंद पडलेली होती. येथील पत्रकार संघाने ही प्रथा परत सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शाम चटपल्लीवार यांचा वाढदिवस योगायोगाने गुरुवारी आल्याने त्यांचा वाढदिवस मंदिरात साजरा करून महाप्रसाद वितरणाची सुरवात करण्याचा निर्णय पत्रकार संघाने घेतला. या प्रसंगी एक छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात उपस्थित मान्यवरांनी ही प्रथा पुन्हा सुरू झाल्याबद्दल यावेळी परिसरातील अनेक साई भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेऊन व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने