Click Here...👇👇👇

गोंडपिपरी तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर......

Bhairav Diwase


गोंडपिपरी:- ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.अश्यातच आज(दि.२९) ग्रामपंचायतचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.त्यामुळे निवडणुकीनंतरही गावागावात सरपंचपद कुणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता शिगेला गेली होती. शुक्रवार (दि.२९) तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत तहसीलदार के.डी.मेश्राम यांनी जाहीर केला आहे.

तालुक्यात ५० ग्रामपंचायती आहेत.यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या.तालुक्यात अनु.जातीसाठी ९ पदे आरक्षित करण्यात आली आहे. 

      यापैकी लाठी (अनुसूचित जाती,महिला), चेकघडोली (अनुसूचित जाती,महिला), कोरंबी (अनुसूचित जाती),किरमिरी (अनुसूचित जाती),चेकनांदगाव (अनुसूचित जाती),गोजोली मक्ता (अनुसूचित जाती,महिला),तारडा (अनुसूचित जाती),कुडेसावली (अनुसूचित जाती,महिला), आक्सापूर(अनुसूचित जाती) या गावांचा समावेश आहे.८ पदे अनु.जमातीसाठी असून ४ पुरूष तर ४ महिलांसाठी आहेत. चेकदुबारपेठ(अनुसुचित जमाती,महिला),कन्हाळगाव (अनुसुचित जमाती),चेकबोरगाव (अनुसुचित जमाती),खरारपेठ(अनुसुचित जमाती,महिला),वडकुली (अनुसुचित जमाती),गणेशपिपरी (अनुसुचित जमाती),फुर्डिहेटी (अनुसुचित जमाती,महिला), विहिरगाव(अनुसुचित जमाती,महिला) या गावांचा समावेश आहे.१३ जागा नामाप्रसाठी असून यात ६ सर्वसाधारण तर ७ महिला राखीव आहेत.यात चेकलिखितवाडा (ना.मा.प्र.महिला),चेकबेरडी (ना.मा.प्र.),तारसा (बुज.) (ना.मा.प्र.),सोमनपल्ली (ना.मा.प्र.महिला),धानापूर (ना.मा.प्र.महिला),वेडगाव (ना.मा.प्र.),सकमूर (ना.मा.प्र.महिला),सोनापूर (देश.) (ना.मा.प्र.),वढोली (ना.मा.प्र.),करंजी (ना.मा.प्र.महिला),वेजगाव (ना.मा.प्र.महिला),हिवरा (ना.मा.प्र.),धाबा (ना.मा.प्र.महिला) समावेश आहे.
खुल्या प्रवर्गासाठी २० जागा आरक्षित असून यात १० सर्वसाधारण तर १० महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. यात महिला गटात परसोडी, दरुर,डोंगरगाव, अडेगाव,चेकपारगाव, नांदगाव, भं. तळोधी,बोरगाव,तोहगाव, चेकपिपरी,तर सर्वसाधारण गटात सुरगाव, पानोरा, धामणगाव, सालेझरी, पोडसा, विठ्ठलवाडा, घडोली, वटराणा,नंदवर्धन,गावांचा समावेश आहे.तालुक्यातील कोणत्या गावाला,कोणत्या वर्गासाठी सरपंचपद आरक्षित होणार हे आज स्पष्ट झाले आहे.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम येथील पंचायत समिती सभागृहात दुपारी दोन वाजता पासून सुरू करण्यात आला होता.यावेळी तालुक्यातील सर्व जी.प सदस्य,पंचायत समिती सभापती,उपसभापती,सर्व पं.स सदस्य,व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.आरक्षण सोडतीनंतर कही खुशी,कही गम अशी परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.

थोडक्यात:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत आहे. "आधार न्यूज नेटवर्क" या न्यूज पोर्टल वर सर्व तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण लवकरच कळेल. थोडा उशीर का होईना, पण आम्ही सर्व तालुक्याचे सरपंचपदाच्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. बघत रहा आपला चॅनल आधार न्यूज नेटवर्क....