(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आनंदगुडा येथे अंगणवाडी केन्द्र आनंदगुडा(भोक्सापूर) व नेहरू युवा केंद्र चंद्रपूर ता. जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकमाला उपस्थित अध्यक्ष शांताबाई गोरे(पोलीस पाटील) आंगणवाडी सेविका सौ. सुलोचना मस्के, मदतनीस, सौ.सुभद्रा लवटे, आशासेविका सौ. सुलोचना होडबे नेहरू युवा केंद्र तालुका समन्व्यक गोविंद गोरे, महानंदा नाईक, पार्वता सलगर, धुरपता धुलगुंडे, आदी महिला यावेळी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी गोविंद गोरे यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगून महिलांनी सावित्रीबाई फुलेचा आदर्श घ्यावा. व घराघरात सावित्री असावी असे मत व्यक्त करून याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.