श्री. अनिल डोंगरे भाजयुमो तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात सलग पाचव्यांदा विचोडा (बू) वॉर्ड क्र १ मधील पॅनल विजयी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 23, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटवर असलेल्या गट ग्रामपंचायत विचोडा रे अंतर्गत मौजा विचोडा ( बू) वॉर्ड नं १ मधील श्री.अनिल डोंगरे यांनी सन २००० पासून निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सलग पाचव्यांदा विजय श्री खेचून आणली. सन २००० ते २०१० ला दुसऱ्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उभे करून पॅनलला निवडून आणण्याची किमया त्यांनी केली. नंतर त्यांनी २०१० च्या निवडणुकीत स्वता सोबत दोन उमेदवार घेऊन निवडणूक जिंकली. आणि स्वता उपसरपंच पद मिळविले. सन २०१५ ला त्यांची पत्नी सौ. किरण अनिल डोंगरे त्यांचे सोबत दोन उमेदवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करून त्यावेळीही बहुमतांनी विजय श्री खेचून आणला व पत्नी सौ. किरण अनिल डोंगरे यांनी सरपंच पदावर बसविले. 


  त्यांचे राजकीय गुरू मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून त्यांच्या उपसरपंच व पत्नी सरपंच यांच्या कार्यकाळात गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विचोडा ( रे) विचोडा (बू) चांदसूर्ला या तिन्ही गावात विकासाच्या माध्यमातून गावचा कायापालट केला. यावेळी भाजपा पार्टी समर्पित मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात शेतकरी ग्राम विकास आघाडी वार्ड क्रं १ चा श्री.अनिल डोंगरे, २) श्रीचंद कुळमेथे ३) प्रियंका प्रमोद जाधव या तिन्ही उमेदवारांचा बहुमातानी विजय झाला असून सलग पाचव्यांदा श्री. अनिल डोंगरे यांनी वार्ड क्रं १ मधील विजश्री खेचून आणला श्री. अनिल डोंगरे यांचे गावकऱ्यातर्फे त्यांचे कौतुक व शुभेच्या चा वर्षाव होत आहे.