क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त चंदनखेडा येथे अनेक युवकांचे रक्तदान.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोविड -१९ मुळे राज्याच्या रक्तपेढित उद्भभवलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा वर्गाला केलेल्या रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक युवकांनी रक्तदान केले.
   
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी महात्मा ज्योतिबा फुले चौक चंदनखेडा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फुर्तिने रक्तदान केले.
       
      याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल हनवते होते.उद्घघाटक म्हणून राजु नामपल्लीवार,प्रमुख अतिथी म्हणून बार्टिचे समतादुत गणेश हनवते,समाजसेवा अधीक्षक पंकज पवार,रक्तपेढी तंत्रज्ञ जय पचारे, योगेश जारोंडे, लताताई नन्नावरे,वनिता जांभुळे, गुलाब भरडे, नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक महेश केदार प्रभृती मंचावर उपस्थित होते.                           
        
    यावेळी गणेश हनवते यांनी आपल्या मार्गदर्शनात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकला.  
          
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चौधरी यांनी केले. संचालन स्वप्निल कुळसंगे,तर आभार आशिष हनवते यांनी मानले . शिबिराच्या यशस्वितेसाठी , राहुल कोसुकार,समिर पठाण, निखिल वाटेकर,शुभम जांभुळे शंकर दडमल ,कुणाल ढोक,अमोल महागमकार, स्वप्निल दडमल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारक मंडळ यांनी सहकार्य केले.