नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांचा होणार सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांचे उद्या दि.२२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता येथील भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात आगमन होत असून ते जनतेशी सुसंवाद साधणार आहेत.तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भद्रावती तालुका व शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे.