ग्रामोदय संघ भद्रावतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रशिक्षण व शोध संस्थान प्रकल्प उभारणार:- ना. नितीन गडकरी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- ग्रामोदय संघाने कला जिवंत ठेवली.प्रकल्पातील उत्पादनाची दहा टक्के निर्यात व्हावी. कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या व कुंभार उद्योगाला पारंपारिक कलेपासून आधुनिकतेकडे नेणाऱ्या ग्रामोदय संघ भद्रावती येथे कुंभारी प्रशिक्षण कले करिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व शोध संस्थान प्रकल्प उभारण्यात येणार असून हे प्रशिक्षण केंद्र जगात अव्वल ठरेल असे प्रतिपादन सूक्ष्म ,लघु तसेच मध्यम मंत्रालय तसेच सडक परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

       भद्रावती येथे नवीन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या उत्पादनाची दहा टक्के निर्यात झाली पाहिजे असेही ते म्हणाले. ग्रामोदय संघ भद्रावती येथे आयोजित खादी व ग्रामोद्योग आयोग स्फूर्ती योजना अंतर्गत कारागीर सशक्तीकरण चर्चा प्रधानमंत्री रोजगार योजना जागृक अभियान चर्चासत्रात ते बोलत होते.

          दहा करोड च्या सदर प्रकल्पाचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे .परंतु सदर निधी प्रकल्पासाठी अपुरा पडत असल्याने या प्रकल्पाला भारत सरकार तर्फे पुन्हा दहा करोडचा निधी देण्यात येईल. यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. प्रकल्पाचा चांगला मास्टर प्लॅन बनवा असेही त्यांनी सांगितले.

             ग्रामोदय संघात काही कारणामुळे वेळेप्रमाणे बदल झाले नाही .त्यामुळे ग्रामोदय संघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला नाही .पण कला जिवंत ठेवण्याचे काम ग्रामोदय संघाने केले .त्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

                   याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे पश्चिम क्षेत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, एल के मिश्रा, व्ही एस लाडे. ग्रामोदय संघ भद्रावती चे अध्यक्ष जितेंद्रकुमार, उपाध्यक्ष विजय श्रीवास्तव व्यासपीठावर उपस्थित होते.
                          

   याप्रसंगी टेराकोटा पोटरी केंद्राबद्दल तसेच योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले .संपूर्ण ग्रामोदय संघाची नितीन गडकरी यांनी पाहणी केली. कारागिरांची चर्चा केली स्पूर्ती योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या कुंभारी क्लस्टर प्रकल्प एक करोड एक्क्याऐंशी लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
    कार्यक्रमाचे संचालन विजय श्रीवास्तव, प्रास्ताविक व आभार जितेंद्र कुमार यांनी मानले.