निखिल भाऊ वाढई, प्रणितभाऊ पाल, आकाश भाऊ येसनकर, रोहित शेंडे, सोहन दहिलकर व इतर युवा वर्ग यांची मागणी.
मुल:- मौजा रत्नापुर ता. मूल जि. चंद्रपूर येथे मागील वर्षी सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता बांधण्यात आला. हा रस्ता १७५ मीटर बांधण्यात आला असून अत्यंत निकृष्ट बांधकामामुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झालेली आहे. सदर रस्त्यावरील गिट्टी वरती आली असून संपूर्ण रस्त्याला तडा गेलेल्या आहेत.यामध्ये संबंधित ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम केले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित कामाची तात्काळ चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर व समाधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी व संबंधित रस्त्याचे पुनर्बांधणी करून रस्ता सुरळीत करा.
प्रशासनाने सदर तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा युवावर्ग तीव्र आंदोलन करणार असा इशारा आपणास देत आहोत.याकरिता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदन देतांना निखिल वाढई , प्रणित पाल ,आकाश येसनकर, गोलू कामळी, हर्षल भुरसे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, साहिल खोब्रागडे, सोहन दहीलकर, अक्षय दुंमावार, करण डोर्लीकर तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते