शेषराव महाराज व्यसनमुक्ती केंद्रात जिल्ह्यातील व्यसनाधीनांची व्यसनमुक्तीसाठी हजेरी....

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथे शेषराव महाराज व्यसनमुक्ती भवनाचे उद्घाटन नुकतेच पार पडले, स्थानिक गोंडपिपरी शहरात व्यसनमुक्ती केंद्र स्थापन झाल्याने तालुक्यातील व्यसनाधीन नागरिकांना नशा तथा व्यसन मुक्त होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे .

तालुक्यात मोठया प्रमाणात गोरगरीब जनता नशेच्या आहारी गेले त्यामुळे स्वतःचे आणि संसाराचे पार वाटोळे झाले, काही देशोधडीला गेले, तर काही यमलोकी परतले. आपल्या समाजातील व्यसनाधीन व्यक्ती समाजात कसे वावरत असतील तसेच कुटुंब आणि स्वतःची काळजी कसे घेत असतील या संपूर्ण गोष्टींचा विचार प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना शाखा गोंडपिपरी यांनी केला आणि व्यसनाधिनांसाठी संघटनेच्या वतीने शहरात शेषराव महाराज व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात आले.

 त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे कारण उद्घाटन झाल्यापासून व्यसनमुक्ती केंद्रात तालुक्यातीलच नाही तर जिल्हा स्तरावरून मोठ्या संख्येने व्यसनाधीन नागरिक कायमस्वरूपी नशा तथा व्यसनमुक्त होण्याकरिता केंद्रात येऊ लागले आहे .या केंद्रात व्यसनांपासून लांब कसे राहावे तसेच व्यसनमुक्त होण्यासाठी सत्संगाच्या माध्यमातून दर सोमवारला आणि शुक्रवारला मार्गदर्शन करण्यात येते. सत्संगात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील तथा तालुक्यातील नागरिक कायम व्यसनमुक्त होण्या करिता येत असतात.सत्संगाद्वारे व्यसनमुक्तीचे कार्यक्रम श्री. गणपती चौधरी गुरुजी (अध्यक्ष व्यसनमुक्त संघटना गोंडपिपरी) यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती भवन चौधरी ले- आऊट येथे दर सोमवारला व शुक्रवारला होत असते.
 व्यसनाच्या आहारी जाऊन जगण्याचे बळ हरवलेल्या व्यसनाधीनानी कायम व्यसनमुक्त होण्याचा संकल्प घेऊन येथिल व्यसनमुक्ती केंद्रात येत आहेत. असंख्य व्यसनाधिनांनी या व्यसनमुक्ती सत्संगाच्या माध्यमातून व्यसनमुक्त झाले असल्याचे सांगण्यात येते.