गोंडपिपरी तालुक्यातील दोन तरुणी झाल्या देशसेवेसाठी सज्ज.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- देशातील सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते. राजकारण, देशसेवा, समाजसेवा यासह विविध क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. पुरूषांच्या खाद्यांला खांदा लावून काम करीत आहे. देशसेवेसाठी कार्यात सुद्धा महिला मागे नसल्याचे गोंडपिपरी तालुक्यातील दोन युवतींने सिद्ध करून दाखविले आहे. कर्मचारी चयन आयोगाने घेतलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या विविध पदाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहे. यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सोमनपल्ली येथील मयुरी सोमनकर हिची केंद्रीय औद्योगिक पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच सोनापूर देशपांडे येथील शुभांगी चौधरी हिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे.

मयुरी हिचे वडील मजुरी करून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शुभांगीचे वडील हे शेती व मजुरी करून मुलींचे शिक्षण पूर्ण केले आहे. या दोघींही चंद्रपूर रामनगर परिसरातील ज्ञानवर्धिनी अभ्यासिकेत अभ्यास करून यश संपादन केले आहे. शुभांगीला लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड होती.

तिने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. शुभांगी व मयुरीच्या वडिलांना आपली मुलगी सैन्यात लागल्याचे कळताच त्यांच्या आनंदाला पारवार उरला नाही. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील वेजगाव येथील स्वप्नील संजय कुचनकर यांची केंद्रीय औद्योगिक पोलीस दलात निवड झाली तर परसोडी येथील महेश विकास मत्ते याची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे. या सर्वांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरूजनांना दिले आहे.