(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील विलोडा या गावचे मूळ रहिवाशी विठ्ठलराव गराटे यांचे आज दि.२० जानेवारी रोजी सकाळी ७.४५ वाजता नागपूर येथील रुग्णालयात निधन झाले.
मृत्युसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे. विलोडा येथील स्मशानभूमित त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी गडचिरोली येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्य केले होते.त्यानंतर शिक्षा अभियानाचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.अनेक सामाजिक संस्थांशी ते जुळलेले होते.