पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील रंजीत पेंदोर रहिवासी आहे. स्वबळावर आयुष्याच्या ध्येयाची वाटचाल करून रंजीत पेंदोर हा सि.आय.एस.एफ (CISF) मध्ये दाखल झाला. अतिशय सामान्य घरामध्ये जन्म घेऊन देशाची सेवा करण्यासाठी तळमळ असलेल्या आणि नियमित अभ्यास करून देशसेवेत जाण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. अशातच सामान्य घरात रंजीत पेंदोर यांचा जन्म सामान्य परिस्थितीत झाला.
लहानपणापासूनच हुशार, बुद्धिवंत, मनमिळावू सर्वगुणसंपन्न असा हा व्यक्ती, परिस्थिती तशीही थोडी गरीबच पण स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं हे मनाशी बाळगले. आणि तश्या दिशेनं रंजीत पेंदोर हा चालू लागला. पण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना या रोगाने सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरले होते आणि निकाल उशीरा लागणार अस जाहीर झाला. अस मनतात की "सब्र का फल मिठा होता है" आणि शेवटी काल निकाल लागला आणि रंजीत पेंदोर हा सि.आय.एस.एफ (CISF) मध्ये निवड झाली. त्याबद्दल गावामध्ये सर्व ठिकाणी रंजीत पेंदोर च कौतुक होत आहे.