Top News

पोंभुर्णा येथिल चिंतामणी महाविद्यालयाला नॅक कडून B+ मानांकन प्राप्त.


Bhairav Diwase.     Feb 23, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे दिनांक 17 फरवरी व 18 फरवरी 2021ला राष्ट्रीय  मूल्यांकन आणि मान्यता परिषद  (नॅक) टीम ने प्रत्यक्ष भेट दिली. त्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पूर्ण तयारी केली होती. नॅक ही संस्था पदवी व पदव्युत्तर विद्यापीठ आणि सलग्नित महाविद्यालय यांची पाच वर्षाची शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्याचे मुल्यांकन करुन मानांकन करीत असते. पोंभुर्णा येथिल चिंतामणी महाविद्यालयाला नॅक कडून CGPA 2.56 गुण प्राप्त झालेत. म्हणजेच B+ मानांकन प्राप्त झालेले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरावरुन चिंतामणी महाविद्यालय व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने