जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध कृषी योजनांकरिता अर्ज सादर केले आहे परंतु सदर योजना मंजूर झालेल्या नाहीत त्यामुळे सदर योजनांचे अर्ज मंजूर करण्यात यावे याकरिता जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचेकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी मागणी केलेली आहे.
यामध्ये कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अनेक योजनांचे अर्ज सादर केलेले आहेत यामध्ये काटेरी तार, ताडपत्री, बॅटरीचलीत स्प्रे पंप, कॅरेट व इतर योजनांकरीता अर्ज सादर केलेले आहेत.
तरी सदर शेतकऱ्यांना या योजनांचा लवकरात लवकर लाभ व्हावा याकरिता भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे मागणी केलेली आहे.
आपण लवकरात लवकर सदर योजनांचे अर्ज मंजूर करून शेतकऱ्यांना लाभ देऊ असे आश्वासन यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील ऊरकूडे यांनी शब्द दिला.